सृष्टिज्ञान - जून २०१७: Srushtidnyan - June 2017 (Marathi Edition) por Multiple Authors

सृष्टिज्ञान - जून २०१७: Srushtidnyan - June 2017 (Marathi Edition) por Multiple Authors

Titulo del libro: सृष्टिज्ञान - जून २०१७: Srushtidnyan - June 2017 (Marathi Edition)

Autor: Multiple Authors

Número de páginas: 99 páginas

Fecha de lanzamiento: August 2, 2017

Editor: BookHungama (Srujan Dreams Pvt. Ltd.)

Obtenga el libro de सृष्टिज्ञान - जून २०१७: Srushtidnyan - June 2017 (Marathi Edition) de Multiple Authors en formato PDF o EPUB. Puedes leer cualquier libro en línea o guardarlo en tus dispositivos. Cualquier libro está disponible para descargar sin necesidad de gastar dinero.

Descargar PDF Leer on-line

Multiple Authors con सृष्टिज्ञान - जून २०१७: Srushtidnyan - June 2017 (Marathi Edition)

सज्ज होऊ या पर्यावरण रक्षणासाठी!
जून महिना आणि जागतिक पर्यावरण दिन हे आता समीकरण होऊन गेले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पर्यावरण रक्षण, संवर्धन, वृक्ष लागवड आणि संगोपन, वन्यजीव, जलचर, कीटक संरक्षण अशा कितीतरी निसर्गाशी निगडीत विषयांवर अनेक मार्गांनी विचारमंथन सुरू होते. चर्चा, भाषणे, लेख, मुलाखती, व्हॉट्सअप मेसेजेस इ. माध्यमांमधून पर्यावरणाचे संरक्षण किती महत्त्वाचे आणि अत्यावश्यक आहे, हा संदेश जगभर पोहोचविला जातो. वास्तवात, आपण खरोखरच पर्यावरणाविषयी जागृत किती झालो आहोत? याचा जगातील प्रत्येक व्यक्तीने विचार करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे, हे निश्चित!
यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार आणि महाराष्ट्रासह भारतात चांगला पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे, ही सुखद बातमी आहे. त्याचा फायदा घेऊन, निसर्गाची हिरवाई, जाणीवपूर्वक वाढवायला हवी. त्याचबरोबर पाण्याचे उत्तम व्यवस्थापन गावपातळीपासूनच करता येईल. हा एक भाग झाला. परंतु पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या – घटकांची दखल खूप गांभीर्याने घेण्याची आपली जबाबदारी ओळखण्याचीही फार गरज आहे.
प्लॅस्टिक कचरा, ई–कचरा कमी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत! बांधकाम पर्यावरण, औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण, नद्यांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, वृक्षतोड, समुद्रकिनाऱ्यांचे पर्यावरणपूर्वक जतन, जल – वायू – ध्वनी – प्रदुषणाला कारणीभूत ठरणारे घटक अशा कितीतरी विषयांबद्दल पुन्हा पुन्हा समाज प्रबोधन करावे लागत आहे, ही गोष्ट स्वयंशिस्तीच्या अभावाचे महत्त्वाचे कारण आहे.
या पर्यावरण दिनाला, मी माझ्याकडून रोजच्या दैनंदिन व्यवहारातून पर्यावरणाला हानीकारक न ठरतील अशा पाच तरी गोष्टी करेन, असे आपण प्रत्येकाने ठरवू या आणि निग्रहाने त्या पाळण्याची सवय लावू या. अशा प्रत्येकाच्या सत्कृतीच पर्यावरण संवधर्नाला निश्चितपणे हातभार लावतील आणि जागतिक तापमानवाढीचे संकट परतवून लावण्याचे मोठे आव्हान स्वीकारले जाईल!